शेतात साठवून ठेवलेला २० क्विंटल कापूस जळून खाक

वडनेर/प्रतिनिधी भाववाढीच्या आशेने शेतातील गोठ्यात साठवून ठेवलेल्या कापसाला आग लागल्याने सुमारे २० क्विंटल कापूस जळून खाक झाला. यात सदर शेतकऱ्याचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना (ता. ११) सकाळच्या सुमारास येरणगाव शिवारात घडल्याचे उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येरणगाव येथील रहिवासी हेमराज नथुजी ढगे यांच्याकडे एकूण १८ एकर शेती असून त्यामधून निघालेला सुमारे१३० क्विंटल कापूस हा भाव वाढीच्या अपेक्षेने येरणगाव शिवारात असलेल्या स्वतःचे फार्म हाऊस मधील तीन खोल्यांमध्ये साठवून ठेवला होता.

दरम्यान, आज सकाळी शेतकरी हेमराज ढगे हे शेतामध्ये गेले असता साठवून ठेवलेल्या कापसाच्या एका खोलीतून धूर निघत असल्याचे दिसून आले. कुलूप बंद असलेल्या खोलीकडे जाऊन बघता कापूस जळत असल्याचे दिसून येताच सर्वत्र आरडाओरड करून तसेच गावकऱ्यांना माहिती देत आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत शेतात साठवून ठेवलेल्या सुमारे १३० क्विंटल पैकी २० क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने सुमारेएक लाख चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले. गावकऱ्यांच्या मदतीने आगविझवण्याचा प्रयत्न यशस्वीठरल्याने होणारी मोठी आर्थिकहानी टळली. येरणगावयेथील सामाजिक कार्यकर्तेविठ्ठल मुडे आणि त्यांच्या मित्र परिवाराने शेतात जाऊन लागलेल्या आगीला विझविण्यासाठी आटोकात प्रयत्न केला.                                         याबाबत शेतकरीहेमराज ढगे यांनी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार केली असूनपोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे. शासन प्रशासनदरबारी मदत मिळावी, अशीमागणी शेतकरी हेमराज ढगे यांनी केली आहे.