चिकमोह येथे वादळासह गारपीट; १३ घरांवरील टीनपत्रं उडाली

 हिंगणघाट/प्रतिनिधी दिवसभर कडाक्याचे उन्ह आणि रात्री स्वच्छ आभाळ असताना अचानक तालुक्यात अचानक वातावरणात बदल होऊन चिकमोह येेथे वादळीवार्यासह गारपीट झाले. यात १३ घरांवरील टिनपत्रे उडाली असुन एक महिला जखमी झाली. यात जवळपास ५ लाख रुपयांच्यावर नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजताच्या सुमारास चिकमोह येथे विजाच्या कडकडासह गारपीट झाली. यात चिकमोह गावातील लोकांच्या घराचे छत उडून गेले. विजेचे खांब, झाडे उन्मळून पडले आहे.

नवीन घराचे विटांच्या भींत कोसळल्याने शेळ ठार झाली. मारुती सोरटे, जयराम कुलासंगे, चंद्रशेखर रोडे, नंदा भोयर, उद्धव मेश्राम, सुमित्र मेश्राम, मारुती चोरटे, महादेव मेश्राम, राजेंद्र तुळसे, अनिल तुडसे, गजानन उबाड, राजेंद्र रोटे, जयाराम कुरसंगे, रमेश ठाकरे, रमेश वावरे, दिनकर येथे, किशोर बायदे, भारत उभार, समीर केंद्रे, सुनील तुरासे, हरिभाऊ जांभुळकर, विठ्ठल गिराम, सुनील रोटे, आदींच्या घराचे टिनपत्रे उडून गेले. यात एक महिला जखमी झाली. नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे.