जलयुक्त शिवार योजनेचा शेतकरी व गावकऱ्यांनी लाभ घ्यावा- आ.डॉ.भोयर

वर्धा/प्रतिनिधी पाण्याचा स्तर झपाट्याने कमी होत आहे. भूगर्भातील पाणी पातळी वाढविणे अत्यावश्यक आहे. धावत्या पाण्याला रोकून त्याचे भूर्गभात पुर्नर्भरण करने निकडीचे आहे. शासनाने जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. शेतकरी, नागरिक व ग्रापं नी पुढाकार घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. डॉ. पंकज भोयर यांनी केले. मृद व जलसंधारण विभागातंर्गत राबविण्यात येणार्या जलयुक्त योजनेच्या दुसर्या टप्प्याचा आ. डॉ. पंकज भोयर यांनी आढावा घेतला. यावेळी वर्धा पंसचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, तहसीलदार रमेश कोळपे, जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता सोयाम, वर्धेचे तालुका कृषी अधिकारी राऊत, सेलू चे गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे, सेलूचे तालुका कृषी अधिकारी जाधव , ग्रापं चे सचिव, सरपंच, सबंधित विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.                                               यावेळी आ. भोयर म्हणाले की, राज्यात निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष व भविष्याचा वेध घेऊन सरकारने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली होती. याजनेतंर्गत नदी नाल्यांचे खोलीकरण करण्यासोबतच वाहत्या पाण्याचा रोकणे व भूगर्भात पाण्याचा स्तर वाढविणे या योजनेचा उद्देश होता. नदी व नाल्यांचे खोलीकरण झाल्याने अनेक गावांची पावसाळयातील पुरातून देखील सुटका झाला होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे भूर्गभातील जलसाठा वाढण्यासोबतच शेतकर्यांना सिंचनाची सोय देखील उपलब्ध झाली होती. मात्र, ही महत्त्वाकांक्षी व वरदान ठरलेली योजना तीन वर्ष बंद होती. आता पुन्हा सरकारने या योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. पाणी हे सर्वांसाठी आवश्यक आहे.

त्यामुळे ही योजना गावागावापयर्ंत पोहचली आहे. शिवार योजनेच्या माध्यमातून योजनेची महती सर्वांपयर्ंत पोहचविणे गरजेचे आहे. ग्रा.पं. व नागरिकांना योजनेचया फायदा लक्षात घेऊन प्रस्ताव सादर करावा व आपल्या गावात योजना राबवावी, असे आवाहन देखील आ. भोयर यांनी केले. योजनेतंर्गत काही गावे सुटली असल्यास त्या गावांचा देखील समावेश करण्यात यावा, असे ही आ. भोयर म्हणाले. बैठकीला भाजपाचे सेलू तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, वर्धा तालुका अध्यक्ष गिरीष कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत कावळे, संजय गांधी निराधार योजना वर्धा तालुकाचे अध्यक्ष फारूक शेख, संगानियो वर्धा शहर अध्यक्ष विरू पांडे, वर्धा विधानसभा प्रमुख आशिष कुचेवार आदी उपस्थित होते.