धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे बालसंस्कार शिबिर संपन्न

वर्धा/प्रतिनिधी समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे सोमवार दि. ८ मे २०२३ रोजी देवी अष्टभुजा मंदिर, धंतोली, वर्धा येथे बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे गरजूना कपडे वाटप, अन्नदान, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे, ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, आरोग्यविषयक तपासणी असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात. लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार करून त्यांना संस्कारक्षम करणे हे उद्देश लक्षात घेऊन न्यासाने या उपक्रमाचे आयोजन केले होतधर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे सौ. शिल्पा पाध्ये यांनी अतिशय सोप्या भाषेत मुलांना सुसंस्काराचे महत्त्व सांगितले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या सौ. स्मिता हरदास यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचा लाभ परिसरातील मुलामुलींनी घेतला.