दूषित पाण्यामुळे ५० जणांना अतिसारची लागण

आष्टी (श.)/प्रतिनिधी का ेल्हापुरी बंधायार् च्या बांधकामाकरिता अडवलेले दूषितपाणी नळ योजनेच्या विहिरीत गेले. तेच पाणी नागरिकांनीपिण्यासाठी वापरल्याने जवळपास५० जणांना अतिसारची लागणझाली आहे. ही घटना बेलोरा खुर्द येथे घडली. तालुक्यातील बेलोरा (खुर्द)नजीकच्या जळगाव येथीलबाकडी नदीवरील कोल्हापुरीबंधार्याच्या बांधकामाकरिताखोदकाम करण्यात आले.सदर खोदकामाजवळ बेलोरायेथील नळ योजनेची विहीरअसल्याने बंधारा बांधकामाकरिता अडवलेले दूषितपाणी नळ योजनेच्या विहिरीत गेले.

तेच दूषित पाणीनागरिकांनी पिण्याकरितावापरल्याने जवळपास ५०जणांना अतिसारची लक्षणेआढळून आली आहे. सदररुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे पाहून नागरिकांनी तालुकाआरोग्य अधिकार्यांना माहिती दिली. आरोग्य विभागानेतत्काळ आपली चमू व आशा सेविका यांना गावात रुग्णांना तपासण्याकरिता पाठवले आहे. सदर बंधार्यातील अडवलेलेदूषित पाणी विहिरीत जाऊ नये म्हणून मातीचा बांध फोडूनसाचलेले पाणी सोडण्यासाठअधिकारी व क ंत्राटदारा ंन माहिती दिली. मात्र, माहिती देऊन सुद्धा त्यांनी लक्ष न देता वेळकाढू धोरण अवलंबिल्याने हा प्रकार घडल्याचा आरोपनागरिकांनी केला आहे. त्यामुळेकंत्राटदारावर कारवाई करण्याचीमागणी नागरिकांकडून केलीजात आहे.