“आमचे नेते परत करा’, पटोलेंचा सेना- राष्ट्रवादीला इशारा

मुंबई/प्रतिनिधी काँग्रेसच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी शनिवारी (६ मे) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. हे काँग्रेसला अजिबात पटलेलं नाही असं दिसुन येत आहे. उद्धव ठाकरे यांना सूचना देऊनही त्यांनी स्नेहल जगताप यांना प्रवेश दिला ही त्यांची चूक आहे. काँग्रेस त्याजागी आपला उमेदवार देईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद वाढू लागल्या आहेत अशा चर्चा आता राजकीय वतर्ुळात रंगू लागली आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील धुसफूस वाढत चालली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी घेतलेले आमचे नेते परत करवेत अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. अनेक नेते पक्षांतर केले जात आहेत त्यावर बोलताना नाना पटोले महाणले की,’हे चुकीच आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्याना पक्षात घेतलं नाही पाहीजे. हे केलं नाही पाहिजे असं आमचं मत आहे.त्यांना आम्ही समजून सांगितलेलं आहे. पण ज्या पद्धतीने हे सर्व केलं जात आहे त्यावर काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये चर्चा करेल. आणि जितक्या लोकांना घेतलं असेल त्यांना आमच्या पक्षाला परत दिले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. किंवा मग त्या जागेवर आम्ही दावा करू असंही पटोले म्हणालेत. तर पुढे ते म्हणाले की, महाविकास आघाडीमद्धे सर्वकाही आलबेल आहे. महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या बातम्या समोर आल्या तर तर भाजपकडून आणल्या जात आहेत.

मूळ मुद्दे बाजूला करण्यासाठी हे समोर आणलं जात आहे. आता ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. आता महाविकास आघाडीमद्धे मोठी धुसफूस पाहायला मिळत आहे. जागा वाटपवरून आणि नेत्यांच्या पक्षांतर यावरून पक्षात धुसफूस दिसून येऊ लागली आहे. पक्षात नेत्यांची पळवापळवी दिसून येऊ लागली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघडी होईल का अशा चर्चेला उधाण आलं आहे.