कर्नाटक निवडणुकीच्या प्रचार तोफा शांत

बंगळुरू/प्रतिनिधी कोणत्याही निवडणुकीत सुटीचा दिवस अर्थात् रविवार अतिशय महत्त्वाचा असतो. त्यानुसार कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात रविवार अतिशय महत्त्वाचा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या सभांनी रविवार गाजवला. सोमवारी प्रचारतोफा शांत होणार असल्याने सर्व राजकीय पक्षांनी संपूर्ण ताकदीनिशीप्रचारात झोकून दिल्याचे चित्र दिसून आले.

येत्या १० मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीची मतदानप्रकि”या पार पडणार आहे. २२४ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान घेतले जाणार असून, भाजपा, काँग”ेससह सर्व पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. दुसरीकडे काँग”ेसचे नेते राहुल गांधी, प्रियांकावढेरा, मल्लिकाजर्ुन खडगे यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनीही काँग्रेस उमेदवारांसाठी मतदारांना साद घातली.