धाम नदी संवाद यात्रेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समारोप

वर्धा/प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चला जाणूया अभियान राबविण्यात येत असून या अभियानात जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या धाम नदीची संवाद यात्रेचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत समारोप झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांसह धाम नदी संवाद यात्रेचे समन्वयक सुनील रहाने, मुरलीधर बेलखोडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा, क्रीडा अधिकारी अनील निमगडे, बजाज फाऊंडेशनचे विनिवेश काकडे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

धाम नदीचा उगम कारंजा तालुक्यातील धामकुंड येथून दि.२० मार्च रोजी या यात्रेस प्रारंभ झाला होता. त्यानंतर हिवरा, वाढोणा, पिंपळखुटा, दाणापूर, महादापुर, खैरवाडा, काचनूर, नान्ही, खरांगणा, मोरांगणा, मजरा, कासारखेडा, सावद, खैरी, चेंडकापुर, सेवा, आंजी, धुळवा, सुकळीबाई, खेरडा, येळाकेळी, वानोडा, इटकी, करताळा, महाकाळ, नागटेकडी, पवनार, वाघापुर, केसलापुर, कुटकी, तळोदी, खरांगणा (गोडे), तुळजापुर, वघाळा, टाकळी (किटे), दिंदोडा, मदणी, मुधापुर, साखरा, हिवरा (साखरा), बावापुर, साकुर्ली, सावंगी देरडा असे मार्गक्रमन करत समुद्रपुर तालक्यातील सुजातपुर येथे वणा नदी संगमावर यात्रेचा शेवट झाला. यात्रेदरम्यान गावात जनजागृती करण्यात आली. नदी संवाद यात्रेचे समन्वयक व गावकऱ्यांमध्ये बैठक झाल्या.

नदीची प्रत्यक्ष पाणी करून नदी प्रदुषणाची कारणे, नदी स्वच्छ, सुंदर, अमृत वाहिनी कशी करता येतील, याबाबत गावकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावात स्वतंत्र, सर्वंकष अभ्यास करण्यात आला. यात अनेक बाबींचा समावेश करण्यात आला असून सदर अहवाल शासनास सादर केला जाणार आहे. धाम नदीची संवाद यात्रा उत्तमप्रकारे पुर्ण करण्यात आली आहे. या यात्रेस गावकऱ्यांचा लाभलेला सहभाग अत्यंत महत्वाची बाब आहे. असाच सहभाग यशोदा व वना नदी यात्रेला लाभेल, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात चला जाणूया नदीला अभियानाचे उत्तम कार होत असून यासाठी सामाजिक संस्थांचा चांगला सहभाग लाभत आहे. नदी समन्यक सुध्दा उत्तम भूमिका बजावर असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.