जिल्ह्यातील ३२ घाटांवर ९ वाळू डेपो

वर्धा/प्रतिनिधी वाळूघाट लिलाव प्रक्रियेनंतर नागरिकांना वाळूमाफीया म्हणेल त्या चढ्या दरात वाळू खरेदी करावी लागते. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असते. अनेक वाळूमाफीया घाट सुरू असताना वाळूचा अवैधसाठा करून ठेवतात. वाळूघाट बंद झाल्यानंतर त्याच वाळूची विक्री करतात. नागरिकांना स्वस्त दरात वाळू मिळावी, याकरिता जिल्ह्यातील ३२ घाट मिळून आष्टी तालुक्यात १, आर्वी १, देवळी १, हिंगणघाट ३, वर्धा १ आणि समुद्रपूर तालुक्यात २ वाळू डेपो सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता सहज वाळू मिळणार आहे. घर बांधकामासाठी लागणारे इतर साहित्य सहज मिळून जाते. मात्र, गत काही दिवसांपासून जिल्ह्यात वाळूचोरीचा गोरखधंदा सुरू आहे.

या व्यवसायातून वाळूमाफीयांनी मोठी माया जमा केली. वाळूघाट बंद असताना मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असल्याने शासनाचासुद्धा महसूल बुडतो. तर नागरिकांना चढ्या दराने वाळू विकत घ्यावी लागते. नागरिकांना शासकीय दरात वाळू मिळावी, याकरिता शासनाने जिल्ह्यात ९ वाळू डेपो सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात आष्टी तालुक्यात वर्धा नदीवरील पर्तोडा घाटावर नवीन रामदरा येथे वाळूघाट तयार करण्यात येणार आहे. यासह आर्वी तालुक्यात सालफळ आणि दिघी-वडगाव हे दोन घाट मिळून रोहणा येथे वाळू डेपो, देवळी तालुक्यात टाकळी (चणा) आणि सोनेगाव (बाई) घाटावर सोनेगाव (बाई) येथे वाळू डेपोची निर्मिती होणार आहे. वर्धा तालुक्यात साती आणि भगवा वाळू घाटावर आलोडी येथे वाळू डेपो, समुद्रपूर तालुक्यातमांडगाव (१), मांडगाव (२),मांडगाव (३), शिवणी, सेवा,मनगाव, मेनखात घाटावर मांडगावयेथे वाळूघाट आणि औरंगपूर(रिठ), उमरा आणि बरबडी घाट मिळून पारडी येथे वाळू डेपोची निर्मिती होणार असल्याची माहितीखनिकर्म अधिकारी डॉ. दौड यांनीदिली. या वाळू डेपोसाठी आवश्यकती सर्व प्रक्रीया पारदर्शक ठेेवण्यातआली आहे.

या संदर्भात अनेकांनावेगवेगळे प्रश्न होेते. त्या प्रश्नांना घेऊन अतिरिक्त जिल्हाधिकारीफ ुलझ ेल े या ंच्या मागर् दशर् नात सभेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यातुनही अनेकांचे गैरसमज दूर झाल्याची माहिती त्यांनी तरुण भारत सोबत बोलताना दिली.

हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक तीन वाळू डेपो

हिंगणघाट तालुक्यात ३वाळू डेपो सुरू होणार आहे. यात चिकमोह, काजळसरा, सोनगाव (धांदे), टेंभा, बोरगाव (धांदे), चिंचोली हे घाट मिळून चिंचोरी (बु.) येथे डेपो, आजनसरा, सावंगीरिठ मिळून सावंगी रिठ येथे डेपो, नांद्रा (रिठ), कुरन (रिठ), ढिवरी पिपरी, डोरला. धोची, शेकापूर(बाई) आणि येळी घाट मिळून येळी येथे वाळू डेपो सुरू होणार आहे.