मणिपूरमधील २३ हजार लोकांना केले रेस्क्यू

नवी दिल्ली/प्रतिनिधी मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारामुळे राज्यातील हिंसाचारग्रस्त भागात आसाम रायफल्स आणि इतर सशस्त्र दल तैनात करण्यात आले आहेत. या हिंसाचारावरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. सशस्त्र दल आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी आतापर्यंत २३,००० हून अधिक नागरिकांना हिंसाचारग्रस्त भागातून बाहेर काढले आहे. मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागात सशस्त्र दलांकडून सतत गस्त सुरू आहे. यासोबतच लष्कराने यासंदर्भात लष्कराच्या जवानांशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे, जेणेकरून लोकांना मदत करता येईल. मागील आठवड्यात मणिपूरमध्ये आदिवासी आणि बहुसंख्य मेईतेई समुदायाच्या लोकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या हिंसाचारात एकूण ५४ जणांचा मृत्यू झाला.

यानंतर, राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्स हिंसाग्रस्त भागात रवाना झाले. मणिपूरमधील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागातील लोकांना मदत करण्यासाठी लष्कराने एक हेल्पडेस्क स्थापन केला आहे. हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यासोबतच लोकांना मदत करता यावी म्हणून हा हेल्पलाइन क्रमांक जास्तीत जास्त लोकांशी शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.