पुलवामात मोठा कट उधळला…५ किलो (IED ) सह अटक

पुलवामा/प्रतिनिधी जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक मोठा धोकादायक कट उधळून लावत पुलवामा येथून दहशतवाद्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ५ किलो इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. पुलवामा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इश्फाक अहमद वानी असे अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या साथीदाराचे नाव आहे. त्याला पुलवामा येथील अरिगाम येथून अटक करण्यात आली आहे.