पेरणी उरकून घ्यावी का? शेतकरी विचारताहेत प्रश्न!

वर्धा/प्रतिनिधी खरीपातील पेरणीसाठी बळीराजा मृग सरींच्या प्रतीक्षेत असतो. मात्र, अवकाळीने कहर केल्याने गेल्या काही दिवसात शेत शिवारात पोटभर पाऊस पडून हातभर ओल गेली, शेत नांगरून ठेवल्याने ढेकळ फुटले आहे. मृगसरींच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी भांबवलेल्या अवस्थेत असून वरूण राजाकडे पेरणी उरकून घ्यावी का? तर पेरणीत लागतो तसा पाऊस झाल्याने शेतकरी प्रश्न उपस्थित करीत आहे. निसर्ग हा मानवाचा सखा सोबती म्हणून ओळखला जातो. ठरल्याप्रमाणे ऋतुचक्र गतिमान होत असल्याने ऋतू सोहळे साजरे होतात.

प्रारंभी पासूनच सृष्टीतील बदल हे अटळ आहे. अशात मात्र, सारं चित्र उलट्या गतीनं फिरत असल्याचा प्रत्यय येतो आहे. वसंताची चाहूल लागताच पानगळीनं रान भकास वाटू लागतं. लगेच ग्रीष्मात सूर्य आग ओकत सार्या धरतीला चटके देत असतो. सूर्याची काहीली वृक्षांना कुरूप करते. तर कोकिळेच्या मंजुळ स्वरांनी निसर्ग लहरी धुंद होऊन बोलू लागते. अशात ऋतू कावरा बावरा झाल्याने उठ की सूट कुस बदलतो आहे. ऐन उन्हाळ्यात चक्क अवकाळी, वादळी पाऊस, गारपीटी नित्याचीच झाली आहे. पावसाने शेतातील ढेकूळ फुटल्याने मृगा आधीच भांबवलेला शेतकरी वरूण राजाकडे पेरणी उरकून घ्यावी का? असा प्रश्न केला तर काय वावगं ठरणार आहे. लहरी निसर्ग मानवी मनाला जणूहुलकावण्या देऊन वाकोडे लावतो आहे. उन्हाळ्यात उन्हाच्या झळानी जीव लाही- लाही होतो. पण, यंदा निसर्ग कावराबावरा झाल्याचे चित्र दिसते आहे.

उन्हाळ्याच्या पहिल्याच चरणापासून सावलीचा अजबखेळ चालू झाला आहे. उन्हाळी पिकांच्या नासाडी सोबतच फळबाग, भाजीपालापिकांची दाणादाण झाली. कृषी प्रधानदेशात आर्थिक कणा असलेल्याबळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. दुसरीकडे महागाईचाभस्मासुर आकांडतांडव करीत जनतेला हैराणकरतो आहे. परिणामी, नैराश्य आलेलाशेतकरी राजा चार तोंड कशी भरवायची? या विवंचनेतच जीवन संपविण्यातच धन्यतामानतो आहे. उन्हाळा अंतिम चरणात आल्याने लग्न सोहळे आटोपून पूर्व पावसाळी मशागतीचे कामे आटोपन्यास प्रारंभ करण्याच्या तयारीतअसताना अलीकडेच अवकाळी, वादळी पाऊस, गारपीटी, मेघगर्जनेसह सोसाट्याच्यावार्यामुळे पावसाळी सदृश्य परिस्थितीचासामना करावा लागत आहे. पाऊस पाठ सोडायला तयार नसल्याने शेतकरी त्रस्तझाला आहे.