दत्तसागर शिवप्रतिष्ठानचा उपक्रम : विद्यार्थ्यांसाठी दिली जीवनोपयोगी वस्तूंची भेट

वर्धा/प्रतिनिधी नालवाडी येथील श्रीछाया अनाथगृहामधील विद्यार्थ्यांकरिता दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, शालेय सामग्री आणि धान्य भेट देऊन सावंगी येथील दत्तसागर शिवप्रतिष्ठान सामाजिक संघटनेद्वारे मेघे समूहाचे विश्वस्त माजी आमदार सागर मेघे या ंचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी, बालगोपालांसाठी सहभोजनही आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, अभिमत विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. श्वेता पिसूळकर, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, शरद पवार दंत महाविद्यालयाच्या संचालक मनीषा मेघे यांची प्रमुख उपस्थिती होती.                                               कार्यक्रमाच्या आयोजनात दत्तसागर शिवप्रतिष्ठान सामाजिक संघटनेचे निलेश ठाकरे, प्रवीण ढोकणे, प्रफुल्ल देशमुख, नितीन चामलाटे, समीर गावंडे, पंकज वानखडे, रुपेश नाखले, मंदार ठाकरे, सुशांत वानखेडे, मनोज भोयर, विजय बगेकर, सुशील भिसे, अजय मेंढे, नीरज रहाटे, प्रशांत शेळके, चेतन काळे, अनंत बाराहाते, पंकज अडेकर, प्रतीक नागोसे, सिद्धार्थ कांबळे व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.