धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे खाऊवाटप संपन्न

वर्धा/प्रतिनिधी समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे शुक्रवार दि.५ मे २०२३ रोजी सौ जयश्री दुर्गे यांच्या घरी, गणेश नगर , बोरगाव मेघे, वर्धा येथे खाऊवाटप करण्यात आले. धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे गरजूना कपडे वाटप, अन्नदान, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, आरोग्यविषयक तपासणी असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.

गरजूंना मदत हा उद्देश लक्षात घेऊन न्यासाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या सौ. ललिता लहाबर यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचा लाभ परिसरातील मुलामुलींनी घेतला.