टाटा एस ने दिली धडक; दिव्यांग युवकाचा मृत्यू

पुलगाव/प्रतिनिधी नजिकच्या खातखेडा नाचणगाव दरम्यान रोहणा येथे जाणार्या दोन युवकांना टाटा एस गाडीने धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाला तर एका युवकाला प्राथमिक उपचारानंतर सेवाग्रामला हलविण्यात आले. रोहणा येथील दोन युवक दुचाकीने जात असताना खातखेडा नाचणगाव दरम्यान विरुद्ध दिशेने येणार्या एम. एच. २९ टी. ४०६५ क्रमांकाच्या वाहनाने दुचाकीला धडक दिली.

यात किशोर उईके (४०) याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर मृत घोषित करण्यात आले तर आनंद पारिसे (३५) यास प्राथमिक उपचारानंतर सेवाग्राम रुग्णालयात रवाना करण्यात आले. पोलिस निरीक्षक शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखालीपोलिस तपास करीत आहेत. टाटा एस चालक तुषार गवारकर (२०) याच्यावर ग ुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे कळते.