आर्वी येथे सट्टापट्टी अड्यावर छापा

आर्वी/प्रतिनिधी गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा येथील गुन्हे शाखेच्या पथकानेशहरातील गणपती वार्डात सुरूअसलेल्या सट्टापट्टी अड्यावरछापा टाकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १३ जणांना अटक केली. ही कारवाई ५ रोजी करण्यात आली. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्यामाहितीनुसार, गुन्हे शाखेच्यापथकास शहरातील लल्ला महाजन त्याच्या नोकरांच्या मदतीने फोनद्वारसट्टापट्टीचे आकडे घेऊन जुगारखेळल्या जात असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारेपोलिसांनी गणपती वॉर्ड आर्वीयेथे छापा टाकला. यावेळी पोलिसांना मुख्य आरोपी प्रकाश ऊर्फ लल्ला महाजनयाच्यासह प्रशांत ऊर्फ लल्लामहाजन (५४) गणपती वार्ड,नरसिंग महाजन रा. आर्वी, दिनेश मालपाणी रा. आर्वी, अमित चौकडे रा. आर्वी, रवी देशमुख रा. आर्वी, राहुल पखाले रा. नांदपूर, दिलीप दौलकर रा. आर्वी, अनिल सहारे रा. आर्वी, मुकेश केने रा. आर्वी, नितीन क्षीरसागर रा. आर्वी, विक्की पाटील रा. आर्वी, वासुदेव पखाले रा. नांदपूर, दिगंबर आहाके रा. वाघेडा पुनर्वसन सट्टापट्टीचे आकडे घेताना मुद्देमालसह मिळून आला.

यावेळी पोलिसांनी जुगारातील रोख ७० हजार, सट्टापट्टीचे साहित्य, मोबाईल, १८ साधे मोबाईल, दुचाकी असा १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोउपनी राम खोत, पोलिस कर्मचारी कैलास सोनवणे, संजय बोगा, विनोद कापसे यांनी केली.