मणिपूरनंतर मेघालयात संघर्ष, १६ जणांना अटक!

शिलाँग/प्रतिनिधी मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये शुक्रवारी कुकी आणि मेईतेई समुदायाच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या चकमकीत पोलिसांनी १६ जणांना अटक केली. हे सर्व शिलाँगमधील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत. ईस्ट खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सिल्वेस्टर नॉटनर म्हणाले – शिलाँगच्या नॉनग्रीम हिल्स भागात मणिपूरच्या कुकी आणि मेईतेई समुदायाच्या विद्यार्थ्यांमध्ये गुरुवारी रात्री भांडण सुरू झाले. या हाणामारीत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी मारामारीवर नियंत्रण मिळवत १६ जणांना अटक केली. मणिपूरच्या विविध भागात मेईतेई आणि आदिवासी यांच्यात संघर्ष सुरू आहे. अनुसूचित जमातीतील मेईतेई समुदायाचा समावेश असलेल्या रॅलीने हाणामारी सुरू झाली.