नादुरुस्त ट्रकला दुचाकीची धडक: दुचाकीस्वार जागीच ठार

गिरड/प्रतिनिधी समुद्रपूर वळण मार्गावर नादुरुस्त ट्रकवर दुचाकी इळज्ञशी लेश्रश्रळवश धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मिळालेल्या माहितीनुसार बुधवार ३ रोजी रासा घोंसा येथील विठ्ठल महातळे (३९) हा एम. एच. ३२ एन. ३४४८ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाट येथे जात असताना वळण मार्गावर नादुरुस्त उभ्या असलेल्या एम. एच. ३५ बि.जी. ५२३८ क्रमांकाच्या ट्रकवर दुचाकी आदळली. ट्रक बंद अवस्थेत असल्याचे कोणतीही सुचना नसल्याने ट्रक दुचाकीस्वारला दिसला नाही.

घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर येथील काही युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आ. समीर कुणावार यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन महातळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. तो हिंगणघाट येथील संत ज्ञानेश्वर वॉर्डातराहुन पाईप लाईनचे कामे करीत होता. बुधवारी तो रासा घोंसा येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठा विभागाचेकाम पाहुण सायंकाळी हिंगणघाट येथे जाण्यासाठी निघाला होता. या घटनेची समुद्रपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस करीत आहे.