“जय भवानी, जय शिवाजी’ म्हणा आणि मतदान करा, उद्धव ठाकरेंचे कर्नाटकातील मतदारांना आवाहन

मुंबई/प्रतिनिधी मतदान करताना “जय बजरंगबली’ म्हणा आणि मतदान करा असे पतंप्रधान मोदींनी जाहीर सभेत सांगितले. धार्मिक आवाहन केले म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता पण कदाचित आता नियम बदलले असतील. देशाचे पंतप्रधानच हिंदूत्वाचा प्रचार करत असतील तर कर्नाटकातील मराठी जनतेने देखील मतदान करताना ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणा आणि मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केले आहे. मराठी बांधवांच्या हित जपणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या उमेदवारांना मत द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.                               महाविकास आघाडीला आमच्याकडून तडा जाणार नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येक पक्षाला पक्षंतर्गत बदल करण्याचे स्वातंत्र्य आहे. शरद पवारांच्या निर्णयानंतर मी त्यानवर बोलेन. माझ्याकडून तरी महाविकास आघाडीला कोणताही तडा जाणार नाही. महाविकास आघाडीला तडा जाईल असं काहीही राष्ट्रवादीत होणार नाही.                       पुस्तकातील आरोपावर उद्धव ठाकरे म्हणाले…

शरद पवारांचे आत्मचरित्र लोक माझे सांगातीमध्ये या आत्मचरित्रात शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयात दोनदा जाण्यावर टीका केली आहे. यावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवारांना सल्ला देणारा मी कोण? दिलेला सल्ला त्यांना पचनी पडेल का?

प्रकल्पासाठी स्थानिकांवर जबरदस्ती नको

बारसूमध्ये मी आमच्या लोकांना भेटायला जातोय, राज्यातील इतर प्रकल्प गुजरातला जात आहेत.पालघरमध्ये लोकांना घरात घुसून बाहेर काढलं असे म्हणत उध्दव ठाकरेंनी टीका केली. प्रकल्पासाठी स्थानिकांवर जबरदस्ती नको असे वक्तव्य ठाकरेंनी केले आहे.

हुकुमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं

देशात हुकुमशाही येणार नाही असं मानणाऱ्या लोकांची एकता व्हायला हवी. मी व्यक्तीचा पराभव करण्यास माझा पाठिंबा नाही, वृत्तीचा पराभव करायचीइच्छा असते. त्यासाठीच हुकुमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं , असे उद्धव ठाकरेयावेळी म्हणाले.