भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत वर्धेतील आठ जणांना संधी

 वर्धा/प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा आज बुधवार ३ रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. याकार्यकारिणीत वर्धा जिल्ह्यातील आठजणांना संधी मिळाली आहे. वर्धा जिपच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरेयांच्याकडे पश्चिम विदर्भ चिटणीस, विशेष निमंत्रितांमध्ये माजी खा.सुरेश वाघमारे, भुपेंद्र शहाणे, सुधीर दिवे, किरण उरकांदे, वर्धेचे माजी नगराध्यक्ष अतुल तराळे कार्यकारिणीसदस्य तर भाजयुमो जिल्हाध्यक्ष वरुण पाठक आणि अशोक विजयकर यांची महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.