जिल्ह्यात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली

वर्धा/प्रतिनिधी जिल्ह्यात अवकाळी पावसाचे तांडव सुरू आहे. शनिवार २९ रोजी रात्रीदरम्यान, वर्धा, देवळी-पुलगाव, सेलू हिंगणघाट तालुक्यात मेघगर्जेनेसह पावसाने हजेरी लावली. तर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होता. रविवार सकाळी सुरू झालेल्या पावसाचा जोर सायंकाळपर्यंत होता. तळेगाव शा. पंत येथे वादळी वार्यामुळे काही झाडे उन्मळून पडली. या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून मशागतींची कामेही ठप्प पडले आहे. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचे तांडव सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी काही वातावरण कायम असून शनिवारी २९ रोजी मध्यरात्रीपासून वर्धा, देवळी-पुलगाव, सेलू, हिंगणघाट तालुक्यात मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

तर इतरतालुक्यातही तुरळक पावसानेहजेरी लावली. रविवारी ३० रोजी ढगाळ वातावरण कायम होते. सकाळी आठ वाजता काहीठिकाणी पावसाने हजेरी लावली.सायंकाळी पुन्हा पावसालासुरूवात झाली. अवकाळी पावसामुळेग्रामीण भागातील जनजीवनविस्कळत झाल े आहे. मे महिन्याला सुरूवातझाली आहे. शेतकरीशेतमशागतीच्या कामातव्यस्त होते. मात्र, गतआठवड्याभरापासून सूर्यदेवतेचेदर्शनच नाही. तर अधूनमधून पाऊसयेत असल्याने शेत मशागतींची कामेठप्प पडली आहे.