बाजार समितीतील विजयाचा जल्लोष राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आमदाराच्या निवासस्थानी जाऊन केला साजरा

हिंगणघाट/प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील सर्वाधिक उलाढाल असलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलने विजय मिळविला आहे. या पॅनल मध्ये भाजप- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- शेतकरी संघटना यांचे उमेदवार होते. या विजयाचा जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एडवोकेट सुधीर कोठारी यांनी आमदार समीर कुणावार यांचे निवासस्थानी जाऊन साजरा केला व कुणावार यांचेही अभिनंदन केले. शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार समीर कुणावार सहकार नेते, बाजार समितीचे सभापती ॲड.सुधीर कोठारी यांनी शेतकरी संघटना व इतरांना सोबत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे विक्रमी १८ पैकी १७ जागेवर एकतफर्ी विजय संपादन करीत बाजार समितीची सत्ता काबीज केली त्या विजयाचा विजयोत्सव आमदार समीर कुणावार यांच्या निवासस्थानी ॲड.सुधीर कोठारी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी साजरा केला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना कुणावार म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज कोठारी यांनी उत्कृष्टपणे सांभाळल्यामुळेच नवनिर्वाचित संचालकांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी मंचावर सुधीर कोठारी, किशोर दिघे, हिम्मत चत ुर,आकाश पा ेहाण े, स ंजय डेहणे, वामन चंदनखेडे, प्रफुल्ल आपल्याला हे यश मिळाले असून बाडे, चंदू मावळे, आशिष पर्बत, यापुढे देखील हिंगणघाट बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताचे व त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असणार असून त्यांनी सर्व अरूण मोटघरे, आफताब खान, महेश झोंटींग, विनोद विटाळे, अनिता मावळे, आदी मान्यवर उपस्थित होते.