खरीपात शेतकऱ्यांना सहजतेने निविष्ठा उपलब्ध होतील याची दक्षता घ्या- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामहा अतिशय महत्वाचा असतो. याहंमागात शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खतांसह आवश्यक कृषिनिविष्ठा सहजतेने उपलब्ध होईल याची दक्षता घ्या, असे निर्देशजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीदिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासभागृहात खरीप हंगामपूर्व आढावाबैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीसुरज गोहाड, उपजिल्हाधिकारीनितीन पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर,आत्माच्या प्रकल्प संचालकडॉ.विद्या मानकर, कार्यकारीअभियंता रवी वऱ्हाडे, जिल्हाअग्रणी बँक प्रबंधक वैभवलहाणे, नाबार्डचे जिल्हाव्यवस्थापक सुशांत पाटीलयांच्यासह विविध विभागाचेअधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री कर्डिले यांनीखरीप हंगामाचा बाबनिहाय आढावाघेतला. या खरीप हंगामात ४ लाख३३ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजनकरण्यात आले असून सर्वाधिक २लाख १५ हजार हेक्टरवर कापूस तर १ लाख ३५ हजार हेक्टरवर सोयाबिनच्या पेरणीचे नियोजनकरण्यात आले आहे. प्रस्तावित नियोजनाप्रमाणे बि-बियाण्यांचीउपलब्धता करण्यात आली आहे. त्यानुसार विविध पिकांचे ६४हजार क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी संबंधित कंपन्यांशी समन्वय साधन्याचे निर्देश बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. खरीपाच्या नियोजनानुसार रासायनिक खतांची देखील मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे. १ लाख १४ हजार मेट्रीक टन इतकी विविध प्रकारच्या खतांची मागणी आहे. त्यात युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी. व अन्य खतांचा समावेश आहे.

जिल्ह्याला आवश्यकतेप्रमाणे टप्प्याटप्प्याने खते उपलब्ध होतील व कृषि सेवा केंद्रांमार्फत निर्धारीत दराने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील याची काळजी घ्या. वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार व ज्यादा भाव आकारले जाणार नाही, याकडे लक्ष देण्याची सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या तक्रारींचे वेळीच निराकरण होणे आवश्यक आहे. यासाठी तयार केल्या जात असलेल्या भरारी पथकाने काटेकोरपणे कारवाई करावी. कुठे गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास त्यावरप्रतिबंध घालावा. खते, बियाणेविक्री केंद्रांना भेटी देण्यासोबतच कृषि निविष्ठा वाहतुकीत अडथळा येणार नाही याकडे लक्ष द्यावे.

गुणनियंत्रणासाठी ९ भरारी पथके

शेतकऱ्यांना प्रमाणित आणि उत्तम दर्जाचे बियाने, खते वअन्य कृषि निविष्ठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषिनिविष्ठांच्या गुणनियंत्रणासाठीजिल्हास्तरावर एक व प्रत्येकतालुक्यात एक याप्रमाणे ८ अशा एकुण ९ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीयपथकाचे प्रमुख कृषि विकासअधिकारी तर तालुकास्तरीयपथकाचे प्रमुख तालुका कृषिअधिकारी आहेत. पथकात कृषिसहवजनमापे निरिक्षकांचा देखीलसमावेश आहे.

१ हजार २०० कोटींच्या कर्जवाटपाचे नियोजन

जिल्ह्यात सन २०२३-२४या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांन१ हजार २०० कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे नियोजनकरण्यात आले आहे. त्यात ९०० कोटी रुपये खरीप हंगाम तर ३०० कोटी रुपये रब्बी हंगामासाठीवाटपाचा समावेश आहे. पात्रशेतकऱ्यांना विना अडथळापीककर्ज उपलब्ध झाले पाहिजे. कुठेही कर्जासाठी शेतकऱ्यांचीअडवण ूक होणार नाही, याकडे लक्ष देण्याचे निर्देशजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीबैठकीत दिले.