४४ महिन्याचे वेतन थकीत; बा. दे. अभियांत्रिकी महा.चे कर्मचारी संपावर

वर्धा/प्रतिनिधी ४४ महिन्यांचे थकीत वेतन देण्यात यावे तसेच न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून नियमित वेतन देण्याच्या मागणीसाठी बुधवार २६ पासून सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची महाविद्यालय व्यवस्थापनाकडून अवहेलना केल्यामुळे कर्मचार्यांमध्ये मोठा रोष दिसून येत आहे. सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय हे जिल्ह्यातील प्रतिष्ठित महाविद्यालय समजल्या जाते. मात्र, याच महाविद्यालयात कर्मचार्यांची कुचंबना होत आहे. १०० च्या वर या महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहे. मात्र, मागील ४४ महिन्यांपासून या कर्मचार्यांना वेतनच दिल्या गेले नाही.

यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात व्यवस्थापनाने पुन्हा चालढकलपणा सुरू केला. ऑक्टोबर २०१८ ते ऑगस्ट २०२१ पर्यंतचे ३५ महिने तसेच जुलै २०२२ ते मार्च २०२३ पर्यंतचे ९ महिने असे ४४ महिन्यांचे याचिका दाखल करण्यात आली वेतन या कर्मचार्यांचे थकीत होती. न्यायालयाने सप्टेंबर २०२१ पासून नियमित वेतन देण्याचे निर्देश महाविद्यालय व्यवस्थापनाला दिले होते. त्यानंतर व्यवस्थापनाने तीन महिने नियमित वेतन दिले. मात्र, असून कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहे. अंतरिम आदेश पारित करताना उच्च न्यायालयाने विशेष टिप्पणी करून सद्य:स्थितीत थकीत असलेल्या ३५ महिन्याच्या वेतनामध्ये अतिरिक्त थकबाकीची वाढ होऊ नये म्हणून सप्टेंबर २०२१ पासून कर्मचार्यांना नियमित वेतन अदा करावे तसे न केल्यास व्यवस्थापनावर गंभीर कारवाई केली जाईल, असा आदेश दिला होता. मात्र, या आदेशालाही व्यवस्थापनाने केराची टोपली दाखवली.

या त्रासाला कंटाळून आता शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. ४४ महिन्यांचे थकीत वेतन देण्यात यावे, सहाव्या व ेतन आया ेगाच्या फरकाची तसेच महागाई भत्ता फरकाची थकबाकी, १ जानेवारी २०१६ पासून आजपर्यंतची सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी देण्यात यावी, अशी मागणी या कर्मचार्यांची आहे.