तज्ज्ञांना वाटतेय चौथ्या लाटेची भीती; आरोग्य यंत्रणांना महत्त्वाचं आवाहन

नवी दिल्ली/प्रतिनिधी देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसा ंपास ून मा ेठी वाढ होत असल्याचं दिसत आहे. यामुळेच आता संशोधकांनी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवेतल्या तज्ज्ञांकडून सिरो सर्वेक्षण करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाद्वारे कोरोनाच्या परिस्थितीचा, प्रसार, प्रचाराबद्दल धोरणे आखण्यासाठीचं नियोजन करणं शक्य होणार आहे. पुण्यातल्या केईएम हॉस्पिटलमधले संशोधक गिरीश दायमा म्हणाले, देशभरातल्या कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता चौथ्या लाटेची भीती आहे. कोरोनाचे गंभीर परिणाम, रुग्णालयात दाखल करण्याची गरज आणि मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधकलसी प्रभावी ठरल्यात. मात्र अजूनही लोकांनी बूस्टर डोस घेतलेला नाही.

कोरोनाचे सततबदलणारे व्हेरिएंट तसंच कोरोना नियमांचं पालन न करणं हे चिंताजनक ठरू शकतं. २०२१ मघ्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, झालेल्यासिरो सर्वेक्षणात असं आढळूनआलं आहे की, ग्रामीणभागात कोरोना संसर्गामध्येवाढ झाली आहे. आणि तीन पैकी दोघांमध्ये आता अँटिबॉडीतयार झाल्या आहेत. सिरो सर्वे क्षण म्हणजे एखाद्या रोगाविरुद्धअँटिबॉडी आहेत की नाही, याबद्दल रक्ताच्या नमुन्यांचीचाचणी केली जाते. सध्याहोणाऱ्या संसर्गाचं प्रमाण आणिस्वरुप तपासण्यासाठी हे एक महत्त्वाचं साधन आहे.