आई-बापाच्या पुण्याईवर आपण आपले जीवन सुकर करीत असतो- वासुदेव कोकाटे

वर्धा/प्रतिनिधी जीवनात अत्यंतर शित्यंतरे येत असतात. जगतांना समाजाचाही विचार करावा लागतो. आपले पूर्वज या परंपरेतून गेले असून तीच परंपरा आपण जोपासली तर आपले जीवन सुकर होत असते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते वासुदेव कोकाटे यांनी केले. ते सावंगी (मेघे) येथे भोजनदान कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करीत होते. ते पुढे म्हणाले, २४ एप्रिल स्मरणात राहणारा दिवस याच दिवशी २ वर्षापूर्वी रामभाऊ अजाबराव ठाकरे यांना काळाने पडदयाआड ढकलले. त्याच तारखेला आमच्या सासुबाई म्हणजे वनिता ठाकरे एक वर्षापूर्वी २४ एप्रिललाच गेल्या. आज त्यांच्या स्मृती जागृत ठेऊन सावंगी (मेघे) येथील विनोबा भावे रुग्णालयांतील २५० रुग्ण परिवारांना भोजनदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या भोजनदान कार्यक्रमाला त्यांचे जेष्ठ पुत्र श्रीकांत उपाख्य बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पत्नी अनिता ठाकरे, मोठे जावई व बहिण वासुदेव कोकाटे व मेघा कोकाटे, लहाण बहीण कविता ठाकरे (इंगोले) त्यांची मैत्रिण वंदना होनाडे, कु. लावण्या कोकाटे, अथर्व ठाकरे, चेतन ठाकरे, मेहेरबाबा सेवाभावी संस्थेचे सावंगीचे संयोजन अमर भेंडेदिनेश रुद्रकार यांची प्रामुख्यानेउपस्थिती होती. या सामाजिक संस्थेच्यावतीने २०/- रुपयामध्ये रोजसकाळ संध्याकाळ ५०० रुग्णांच्यापालकांना भोजन दिल्या जात असूनतेरवीवर खर्च करण्यापेक्षा यारुग्णालयातील रुग्णांच्या परिवारांनामदत करण्यासाठी मेहेर सेवाभावी संस्थेला आर्थिक मदत करावीअसे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.