टेलिग्राम पोस्टमुळे एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळले, घाबरू नका डेटा लिक झालेला नाही, आयोगाचे ट्विटघाबरू नका डेटा लिक झालेला नाही, आयोगाचे ट्विट

 मुंबई/प्रतिनिधी एमपीएससीची पूर्व परीक्षा येत्या रविवारी म्हणजे ३० एप्रिलला होणारआहे. पण या परीक्षेच्या तोंडावरधक्कादायक प्रकार समोर आला आहे.एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटची लिंक टेलिग्रामवरशेअर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाल आहे. एवढतं नव्हटेलिग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्येविद्यार्थ्यांच्या आधार कार्डसह इतर अनेक वैयक्तीक माहिती लिककेल्याचा दावा करण्यात आला आहे.या सर्व प्रकरणाची एमपीएससीकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे.विद्यार्थ्यांचा कुठलाही वैयक्तीक डेटा लिक झालेला नाही. फक्त हॉलतिकीटची लिंक शेअर केली गेली आहे, असं एमपीएससीने म्हटलं आहे.

टेलिग्रमावर शेअर केलेल्यालिंकमध्ये एमपीएससीची गट ब आणिगट क संयुक्त परीक्षा देणाऱ्या ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटची लिंक शेअर केल्याचं समोरआलं. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीचएमपीएससीने विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाइन पद्धतीने वितरीत केले आहेत. पण सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट एकाच लिंकवर शेअर करण्यात आल्याने आणि त्यासोबतचऑनलाइन पोर्टल लॉगइन, फी पावती,अपलोड कागदपत्रे, आधारकार्डक्रमांक, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आणि इतर माहिती उपलब्ध असल्याचा दावा टेलिग्रामवरीलपोस्टवरून करण्यात आला होता.

एवढचं नव्हे तर ३० तारखेला होणाऱ्या पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला. ट ेलिग ्रामवरील पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि या पोस्टमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ाची दखल आयोगाने घेतली आहआयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. एमपीएससी उमेदवारांचावैयक्तीक डाटा उपलब्ध झाल्याचादावा टेलिग्राम चॅनेलवरून करण्यात आला. हा दावा पूर्णपणे खोटाआहे. उमेदवारांच्या हॉल तिकीटची लक श ेअर केली गेली आहे असं एमपीएससीने म्हटलं आहे.एमपीएससीने या प्रकरणी ट्विट करून माहिती दिली आहे. एमपीएससीने पत्रक जारी केलं आहे.

एमपीएससीने काय म्हटलं आहे?

१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे दिनांक २१ एप्रिल २०२३ ला आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेलीप्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवरप्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली आहे.

सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे वेशप्रमाणपत्र उपलब्ध करूनदेण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सदर चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे (हॉल तिकीट) वगळताउमेदवारांचा कोणताही अन्यडेटा लिकझालेला नाही. याची तज्ज्ञांकडून खात्रीकरण्यात आली आहे. तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक डेटा आणि प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचादावा धादांत खोटा आहे आहे.अशाप्रकारे कोणताही डेटा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही. २. आयोगाच्या ऑनलाइनअर्जप्रणालीद्वारे डाउनलोड करूनघेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्याआधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. ३. प्रवेशप्रमाणपत्र लिककरणाऱ्या चॅनेलच्या ॲडमिनविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. प्रस्तुत प्रकरणाची सखोलचौकशी करण्यात येत आहे. ४. तसेच पूर्वनियोजितळापत्रकानुसार विषयांकित परीक्षेचआयोजन करण्यात येईल.

विद्यार्थ्यांना डेटा लिकचा संशय

एमपीएससीने फक्त काही वेळातच माहिती दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी. हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लिक झाले आहे. मग डेटा लिक झाला नसेल हे कशावरून? असा प्रश्न विचारत शंका उपस्थित केली आहे. तसंच प्रश्नपत्रिकाही लिक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरण एमपीएससीने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.