पंतप्रधान मोदी आमची हाक ऐका; बृजभूषण, पोलीस, मंत्रालयाविरोधात पैलवानांचे गंभीर आरोप

नवी दिल्ली/प्रतिनिधी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार ब्रृजभूषणसिंह यांच्याविरोधात आज पुन्हा पुरुष तसेच महिला पैलवानांनीउपोषणाला सुरुवात केली आहे. जोवर न्याय मिळत नाही तोवरजंतर मंतरवरच राहणार असल्याचीघोषणा या पैलवानांनी केली आहे.ब्रृजभूषण यांनी सात महिलापैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचाआरोप अडीज महिन्यांपूर्वी करण्यआला होता. परंतू, त्यांच्यावरआजवर कोणतीही कारवाई करण्यातआली नसल्याचा आरोप बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षीमलिक यांनी केला आहे. तिघांनीही आज पत्रकारपरिषद घेतली, यामध्ये त्यांनीपोलीस आणि मंत्रालयावरही गंभीरआरोप केले आहेत. सात महिला पैलवानांनी तक्रार दिलेली आहे.

परंतू पोलिसांनी अद्याप यावरएफआयआर दाखल केलेला नाहीय.पोलीस अधिकारी सोमवारी बोलू असे सांगत आहेत, परंतू ते यात विलंब करत आहेत. हे प्रकरण एवढेनाजूक आहे की यात एवढा वेळ का लावला जात आहे हे समजत नाहीय, असा आरोप साक्षी हिने केला आहे. अडीज महिन्यांपूर्वीच्याआरोपांवर चा ैकशी समिती बसविण्यात आली. परंतू यासमितीने काय तपास केला आणि काय निष्कर्ष काढला हे समोर आलेले नाही. पैलवानांच्या लैंगिक शोषणाचे हे प्रकरणरआहे. हॅरॅसमेंटचे प्रकरण कितीघातक असते, आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून हे झेलत आहोत. आम्हीच सुरक्षित नसू तर कोण सुरक्षित असेल.

मंत्रालय आणि कमिटीकडून आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून उत्तर मागत आहोत. मात्र ते वेळही देत नाहीएत, असा आरोप साक्षीने केला आहे. ब्रृजभूषण सिंहांना वाचविण्यासाठी कोण कोण लोक त्याची साथ देत आहेत आम्हाला माहिती नाहीय. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोवर आम्ही इथून हलणार नाही, असे पुनियाने म्हटले. यादरम्यान विनेश फोगाट भावूक होऊन रडू लागली होती. आम्हाला तेव्हाही विश्वास होता, आताही आहे की आम्हाला न्याय मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमची हाक आहे की आमचेऐकावे, कुस्ती सुरक्षित हातांमध्ये जावी असे आम्हाला वाटत आहे.आमच्या तक्रारीवर कारवाई केली जात नाहीय. आता या लोकांनी आम्ही संपल्याचे सांगायला सुरुवातकेली आहे, आम्हाला खोट पाडण्याचा प्रयत्न करू नका, असेआवाहन साक्षी हिने केले आहे. आम्ही जंतर मंतरवरच मरू, अवघ्या देशाने पाहूदे तरी. बृजभूषण यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी फोगाटने केली आहे.