बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घ्या- आ. कुणावर

वर्धा/प्रतिनिधी वातावरणात ऋतूनुसार होणारे बदल लक्षात घेऊन प्रत्येकानेआपल्या आरोग्याची काळजीघ्यावी. तसेच भारतीय जीवनशैलीचाआणि उपचार पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी बिडकरमहाविद्यालय, हिंगणघाट येथेआयोजित आयुर्वेदोपचार वशल्यचिकित्सा पूर्वतपासणीशबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालितमहात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय, भारत स्वाभिमान न्यास, पतंजली योग समिती आणि अभिनव विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन समारोहाला प्रा. डॉ. उषाकिरण थुटे, अशोक आकडे, ज्ञानेर्श्वर खडसे, डॉ. शीतल आसुटकर, पौर्णिमा धात्रक, डॉ. राजुरकर, नितिन सुकळकर यांची उपस्थिती होती.

यावेळी अतिथी व तज्ज्ञा ंनी शिबिराला उपस्थित नागरिकांना बदलत्या वातावरणात आरोग्याविषयक काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरात शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. शीतल आसुटकर, डॉ. अमर कडव, डॉ. देवेश नागपुरे, डॉ. योगेश यादव यांनी मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया, हायड्रोसील इत्यादी व्याधींच्या रुग्णांची तपासणी केली. याशिवाय स्त्रीरोग, बालरोग व सामान्य आजारांच्या रुग्णांची तपासणीही यावेळी करण्यात आली. रुग्णांना शिबीरस्थळी निःशुल्क औषधे देण्यात आली. शिबिरात नोंदणी करण्यात आलेल्या गुदरोग व अंडकोषविकार असलेल्या व्याधिग्रस्त रुग्णांची महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय, सालोड येथे नाममात्र सेवाशुल्कात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पतंजलीचे वसंत पाल, राजा शेंडे, योगेश सुकंटवार, विनित श्रीवास, डॉ.नाखले, रवी भालकर, भैय्या निखाडे, विजय धात्रक, प्रभाकर कोळसे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता वंदना वाघ यांनी सहकार्य केले.