भारतीय मूल्याचे जागतिकीकरण करण्यात जनसंपर्काची भूमिका महत्त्वाची- सुधीर पाठक

वर्धा/प्रतिनिधी भारताची गौरवशाली परंपरा, संस्कृती आणि मूल्य यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करवून देण्यात जनसंपर्काची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे असे प्रतिपादन तरुण भारतचे माजी संपादक व माध्यम विशेषज्ञ सुधीर पाठक यांनी केले. ते पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, वर्धा चॅप्टरच्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त शुक्रवार २१ रोजी “जी-२० आणि भारतीय मूल्य : जनसंपर्काची भूमिका’ या विषयावर आयोजित आभासी व्याख्यानात बोलत होते. ते पुढे म्हणाले, भारताच्या वसुधैव कुटुंबकम् या विचाराने सर्वांना जोडण्याचे काम केले आहे. रामराज्य संकल्पना व भारताची पुरातन गौरवशाली परंपरा यावर विस्ताराने भाष्य केले. महात्मा गांधींनी “वैष्णव जन तो तेणे कहिए’ या विचारातून विश्वकल्याणाची कामना केली तर विनोबाजींनी गीतेची वचने गीताईतरूपायित केली.

स ंत ज्ञान ेश्वर महाराजांनी तर स्वत:साठी नव्हेतर विश्वमांगल्यासाठी पसायदानमागितले. भारताला जी-२० चे अध्यक्षपद मिळाल्याने जगाच्यानजरा भारताकडे लागल्या आहेत. आम्हाला भारतीय मूल्येआणि शौर्याचा ठेवा यातूनजगाला नवा मार्ग दाखवायचाआहे. जी -२० च्या निमित्तानेवित्तीय संकटे दूर करणे, सूक्ष्मअर्थ व्यवस्था, पर्यावरण बदल, आरोग्य सुधारणा या सारख्याव्यापक लोककल्याणकारी विषयांवगंभीर व सखोल विचार करण्याची गरज आहे. एक पृथ्वी, एककुटुंब आणि एक भविष्य हे स्वप्न साकार करण्यासाठी जी-२० हेअत्यंत उपयोगी व्यासपीठ असून विश्वमंगलाच्या या संकल्पातजनसंपर्क एक प्रभावी माध्यमबनले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. राजेश लेहकपुरे यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमात पीआरएसआय वर्धा चॅप्टरचे अध्यक्ष प्रो. अनिल कुमार राय, प्रा. राजेंद्र मुंढे, प्रफुल्ल दाते, डॉ. संदीप वर्मा, आदीउपस्थित होते.