तेरा गावांत आता दोन दिवसाआड नळाला पाणी; ग्रामस्थांना करावा लागेल पाण्याचा काटकसरीने वापर

वर्धा/प्रतिनिधी शहरालगतच्या पिपरी (मेघे)सह तेरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासन पाणीपुरवठा करते. पण सध्या पाण्याची मागणी वाढल्याने आणि योग्य दाबाने नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आल्याने या तेरा गावांना आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या गावांमधील नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करून पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), उमरी (मेघे), सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), भुगाव, वायगाव (नि.), कारला, आलोडी, साटोडा, नालवाडी, दत्तपूर, म्हसाळा, वरूड या गावांमधील नागरिकांची तृष्णातृप्ती करते. संबंधित तेरा गावांतील सुमारे २१ हजार कुटुंबांना मजिप्रा नळाद्वारे एक दिवसाआड पाणीपुरवठा करत असले तरी सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची मागणी बऱ्यापैकी वाढली आहे.

नागरिकांची वाढती पाण्याची मागणी आणि पाणीपुरवठा योग्य दाबाने होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर उन्हाळ्याच्या दिवसांतही नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे मजिप्राच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. पाण्याची वाढती मागणी तसेच पाणी पुरवठा योग्य दाबाने होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने वर्धा हरालगतच्या तेरा गावांना दोन दिवसाआड पाण्यावर प्रक्रिया करते.

पिण्यायोग्य पाणी तब्बल २१ जलकुंभात साठविल्या जाते. याच पाण्याचा पुरवठा पिपरी (मेघे)सह तेरा गावांमधील नागरिकांना केला जातो. पाण्याची वाढती मागणी आणि योग्य दाबाने पिपरी (मेघे)सह तेरा गावांना पाणीपुरवठा होत नसल्याचे लक्षात आले पाणीपुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. आहे. उन्हाळ्याच्या दिवसांतही नागरिकांना याची अंमलबजावणी २२ एप्रिलपासून होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून दररोज २२ दशलक्ष लिटर पाण्याची उचल करून मुबलक पाणी मिळावे या हेतूने संबंधित तेरा गावांत आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

– पी. वाय. मदनकर, उपअभियंता, मजिप्रा, वर्धा.