“मन की बातचा’ रविवारी १०० वा भाग होणार प्रसारित; जारी करणार १०० रुपयांचं नाणं

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या बहुचर्चित कार्यक्रमाचा १०० वा भाग लवकरच प्रसारित होणार आहे. हा भाग खूपच खास असणार आहे. १०० व्या भागानिमित्त सरकारने १०० रुपयांचं नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजेच ३० एप्रिल २०२३ रोजी ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारित होणार आहे. हा भाग प्रसारित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी खूप मेहनत घेत आहे. एक लाखापेक्षा अधिक मंडळींना बूथवर १०० वा भाग ऐकता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. रजत, तांबे, निकिल आणि जस्ता या चार धातूंपासून हे ४४ मिलीमीटरचं १०० रुपयांचं गोलाकार नाणं बनवण्यात आलं आहे.

नाण्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभ असणार आहे. त्याच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेले असेल. डाव्या बाजूस देवनागरीमध्ये ‘भारत’ तर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘खपवळर’ असं लिहिलेलं आहे. नाण्याच्या मागच्या बाजूला ‘मन की बात’च्या १०० व्या भागाचं प्रतिक असलेलं खास चिन्ह असणार आहे. मायक्रोफोनचं चित्र आणि त्यावर २०२३ असे लिहिलेले असेल. तसेच या चित्राच्या वरच्या बाजूला देवनागरीमध्ये ‘मन की बात १००’ आणि इंग्रजीत ‘चरपप घळ इररीं १००’ असं लिहिण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी याआधीदेखील माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सलग चार वर्षांसाठी १०० रुपयांचं नाणं जारी केलं होतं. तसेच नरेंद्र मोदी यांनी राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्तदेखील १०० रुपयांचं नाणं जारी केलं होतं.

तसेच महाराणा प्रताप यांच्या ४७६ व्या जयंतीनिमित्त १०० रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं होतं. २०१०, २०११, २०१२, २०१४ आणि २०१५ सालीदेखील १०० रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १०० व्या भागाची देशभरात चर्चा आहे. तसेच परदेशातदेखील या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे. १०० व्या भागात ‘पद्म भूषण’ आणि ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या दिग्गजांचा सन्मान करण्यात येणार आहे. या १०० व्या भागाची देशासह परदेशातदेखील चांगलीच चर्चा रंगली आहे.