बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त भीमगीत मैफल

वर्धा/प्रतिनिधी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारी ‘भीमराया, घे तुझ्या या लेकरांची वंदना’ ही मैफल दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेअंतर्गत कार्यान्वित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघाद्वारे सादर करण्यात आली. यावेळी मेघे शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने सुमधुर स्वरात भीमगीतांचे सादरीकरण केले. सावंगी मेघे येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, जयंती उत्सव संयोजक डॉ. अमोल लोहकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.                                            मैफलीची सुरुवात प्रवीण सुटे यांनी सादर केलेल्या बुद्धवंदनेने झाली. मैफलीत शल्यचिकित्सक डॉ. यशवंत लामतुरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरेखा तायडे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास दुधेकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल लोहकरे, डॉ. सारिका गायकवाड, माधुरी मेश्राम, किशोर पोपटकर, लता सोरदे, संगीता कांबळे, अर्चना ढेपे, धम्मदिना बुरबुरे, सिद्धांत कांबळे, संजया नगराळे, रीता वाघ, प्रभा पाटील, प्रीती लोखंडे, सुजाता जीवने, सूनीता डा ेंगरे, च ंदा पाटील यांनी एकापेक्षा एक सुरेल गीतरचना सादर केल्या. या गायकांना चारू साळवे (कीबोर्ड), दिनेश गवई (तबला), स्वप्नील कावळे (ढोलक), रवी ढोबळे (तुंबा), अजिंक्य काळे (ऑक्टोपॅड), दिनेश कांबळे व रितेश गुजर (गिटार) यांनी संगीतसाथ केली. मैफलीचे सूत्रसंचालन विशाखा मून आणि जितेंद्र आगलावे यांनी केले. या कार्यक्रमात भीमजयंती उत्सवानिमित्त आयोजित भारतीय संविधान या विषयावरील रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रथम किरण कांबळे, द्वितीय आरजू उके, तृतीय राकेश अगडे व ज्योती मोहदुरे यांच्यासह बबिता हाडके, आरती कोवे, प्रियांका गायकवाड, जागृती चरभे, नितीन गायकवाड, काजल भगत यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कर्मचारी संघाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.