आदर्श गाव दिघी येथे सहभागी गाव मुल्यांकनाचे आयोजन

वर्धा/प्रतिनिधी डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा अंतर्गत आदर्श गाव निर्मिती करीता देवळी तालुक्यातील दिघी (बो.) गावामध्ये सहभागी ाव मूल्यांकन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुशल मनुष्यबळ वापरुन सामाजिक क्षेत्रातील विकासाच्या समस्यांवर उचित तंत्रज्ञानाच्या वापराने तोडगा शोधणे गरजेचे आहे. स्थानिक गरजेनुसार व मागणीवर आधारित स्थानिक परिस्थितीला अनुरुप व उचित कार्याला चालना देणे व ते जोपासणे तसेच नागरिक, लोकप्रतिनिधी व विविध शासकीय यंत्रणा यांच्या सहभागाने परिणामकारक कार्य प्रणाली विकसित करणे या उद्देशाने आदर्श गाव निर्माण करीता दिघी (बो.) या गावाची निवड करण्यात आली.

कृषि विज्ञान केंद्र, सेलसुराचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जीवन कतोरे यांच्या अधिपत्याखाली गावातील कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या अनुषंगाने दिघी (बो.) गावामध्ये सहभागी गाव मुल्यांकन करण्यात आले. या दरम्यान लोक सहभागातून गाव पाहणी करून गाव नकाशा, शेत शिवार नकाशा तयार करण्यात आले तसेच गावातील प्रत्येक कुटुंबाची माहिती घेऊन विश्लेषणात्मक माहिती संकलित रण्यात येत आहे. सदर कार्याकरिता दिघ(बो.) येथील सरपंच घनश्याम कांबळे,विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ.अंकिताअंगाईतकर व कृषि सहायक संतोष बुधवंत यांनी योगदान दिले. कृषि विज्ञान केंद्राचे सर्व विषयतज्ञगावामध्ये भेटी देऊन शेतकऱ्यांच्या शेती विषयक समस्यांचे निवारण करीत असतात.

गावामध्ये बदल घडवून आणण्याकरिताप्रत्येक कार्यक्रम दरम्यान गावकऱ्यांचेमोलाचे सहकार्य सातत्याने मिळते. कृषि विद्यापीठाचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंतपोहोचविण्याकरिता कृषि विज्ञान केंद्र,सेलसुरा सदैव कार्यरत आहे. गावामध्येबदल झाल्यास सर्व शेतकरी समृद्ध होतील वतर गावांकरिता एक आदर्श निर्माण होऊन जिल्ह्यातील सर्वच गाव आदर्श गाव म्हणून उदयास येतील, असे केव्हीकेच्यावतीनेकळविण्यात आले आहे.