हलाखीच्या परिस्थितीवर मात करून आकाशची विदेशात भरारी

 गिरड/प्रतिनिधी परिस्थिती कशीही असली तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आत्मविश्वासाने खंबिरपणे उभे ठाकता येते. याचे उदाहरण गिरडच्या आकाश डंभारे या युवकाच्या कतर्ृत्त्वातून सिद्ध झाले. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून आकाशने मोफत कृषी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी विदेशात भरारी घेतली आहे. भारतातील गो टू ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून डेन्मार्क येथे त्याची निवड झाली आहे. आकाशचे वडिल रामदास डंभारे यांच्याकडे ३ एकर शेतजमीन आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलीचे लग्नआणि मुलाचे शिक्षण यासाठी शेतीलाशेतमजुरीचा जोड लागला. अशापरिस्थितीत आकाशने हाताला जे काममिळेल ते करून शिक्षण घेऊ लागला.

बारावी पर्यंतचे शिक्षण गिरड आणि समुद्रपूर येथे पुर्ण केले. तर वरोरा येथील आनंदवन येथे कृषी प्रशिक्षण शक्षण घेतले. यानंतर जळगाव येथीलकृषी विद्यालयातून कृषी पदविका पुर्णकेली. कृषी क्षेत्रातील इंडियन अभ्यासपरीक्षेत निवड झाली. त्याअंतर्गत गो टू ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून डेन्मार्कयेथे निवड झाली असून आकाशला कृषी क्षेत्रातील प्रशिक्षण आणि नोकरीकरण्याची संधी मिळाली आहे. मात्र, डेन्मार्क येथे जाण्याचा प्रश्नाकाशला भेडसावत असताना माजीजिप सदस्य फकीरा खडसे यांनी जाम थील पीव्ही टेक्सटाईलचे व्यवस्थापकभुपेंद्र शाहने यांची मदत घेतली.प्रवासाची व्यवस्था शाहने यांनी करूनदिल्याने आकाश आता चिंतामुक्तझाला आहे. आकाश डंभारे याची निवड झाल्याबद्दल गिरडचे सरपंच राजूनौकरकर, मोहगावचे सरपंच विलास नवघरे, माजी जिप सदस्य फकीराखडसे, पत्रकार गजानन गारघाटे यांनीआकाश डंभारे यांच्या घरी जाऊन त्याचे पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.