कड्याक्याच्या उन्हात विजेची दांडी

पुलगाव/प्रतिनिधी दररा ेज तिव ्रता वाढवीत जाणारे उन्ह पडत असताना विद्युत महामंडळाने दररोज नियमित विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावल्याने जनता हवालदिल झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे बचावासाठी पंखे,कुलर,फ्रीज यांची आवश्यकता आहे. उन्हाळी जिन्नस शेवया, पापड, कुरडया इत्यादि उन्हाळ्यात केले जातात. आता हे वाळवण विद्युत यंत्रांद्वारे केले जातात. अक्षय तृतीयेला याचा विशेष मान असतो.अशावेळी रोज सकाळी ८ ते १२ किंवा २ पर्यंत विद्युत पुरवठा खंडित होत आहे.हा क्रम पुन्हा आठवडाभर चालणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला,वृद्ध अस्वस्थ झाले आहे. विद्युत विभागाचा दुरुस्ती दिवस असतो. त्यावेळी दुरुस्तीचे कार्य आटोपून इतर वेळी नियमित विद्युत पुरवठा करणे आवश्यक आहे. परंतु विद्युत विभाग सतत कामे काढून सामान्य नागरिकांना आवश्यक तेव्हाच पुरवठा खंडित करून सळो की पळो करून सोडत आहे.