कोरोनात बंद झालेल्या रेल्वेचे थांबे पुर्ववत करा

हिंगणघाट/प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भाव असताना बंद झालेल्या रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्याकरिता अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी आहे. मागणी पुर्ण न झाल्याने वर्धा-बल्लारशाह यात्री संघाने स्थानिक रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन कोरोना काळात बंद झालेले रेल्वे थांबे पुर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. हिंगणघाट शहरातुन रेल्वे प्रवास करणार्या अनेक प्रवाशांना अडचनीचा सामना करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून अनेक संघटना कड ून आंदोलन करण्यात आली, निवेदन देण्यात आली. पण त्याची दखल घेत हिंगणघाट येथे दोन रेल्वे गाड्याना थांबा देण्यात आला.                            परंतु, कोरोनाच्या आधी हिंगणघाट रेल्वे स्टेशन वरती थांबा असणार्या रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा देण्याच्या मागणी करिता हिंगणघाट येथील यात्री संघटना वर्धा बल्लारशाह यात्री संघाकडून शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळून रॅली काढण्यात आली. संघाचे अध्यक्ष लिलाधर मडावी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्टेशन अधीक्षक हेमराज पाटील आणि आर. पी.एफ. ठाणेदार पी. एन. मिश्र यांना कोरोना काळात थांबलेल्या गाड्यांचा थांबा आणि रेल्वे स्थानकावर मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात या मागणीचे निवेदन दिले. निवेदन देताना राजेश ए. कोचर, दिलीप बालपांडे, डि. के. गुरनुले, अशोक सोरटे, हरिश सिंघवी, मुरली पोतदार, ऋषीकेश सिंघवी उपस्थित होते. हिंगणघाट रेल्वे स्टेशन हे चेन्नई- मुंबई रेल्वे मार्गावरील स्टेशन आहे. कोरोना कालावधीत लॉकडाऊनपूर्वी हिंगणघाट स्टेशनवर जयपूर, कोरबा, गोरखपूर, इंदौर जनता एक्सप्रेसचा व इत्यादी गाड्यांचा थांबा होता.

मात्र कोरोनाचे निर्बंध संपल्यानंतर सर्व रेल्वे गाड्या सुरू झाल्या असताना पूर्वी असलेला हिंगणघाट रेल्वे स्थानकावर लाहोटी, मुन्ना त्रिवेदी, रामलाल शर्मा, थांबा वगळण्यात आला, जवळपास रवि जुमडे, किशोर रहेजा, संजय खत्री, गणेश जोशी, राष्ट्रपाल कांबळे, कनक ओस्तवाल, दिनेश मोटवानी, संजय हिवरकर, गोपाल पुरोहित, विनोद १५ महिन्यांच्या कालावधी उलटूनही थांबा पुर्ववत न झाल्या या गाड्यांचा थांबा कधी सुरू होणार असा सवाल नागरिकांत रोष पहावयास मिळत आहे.