भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचे काम सुरू- उद्धव ठाकरे

नागपूर/प्रतिनिधी आपल्या देशात आज लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचे गिर्हाईक आणि सत्ताधार्यांचे मतदार वाढवण्यासाठी केला जातोय. त्यांचे मित्र जगात श्रीमंतांच्या यादीत अव्वल आहेत आणि आपल्या देशाचा क्रमांक खाली-खाली येत आहे. भारत मातेच्या पायामध्ये पुन्हा बेड्या घालण्याचे काम सुरू असून बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचे रक्षण करण्याची वेळ आली आहे, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. महाविकास आघाडीतर्फे रविवारी सायंकाळी ५ वाजता पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर ‘वज्रमुठ’ सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत मार्गदर्शनकरताना उद्धव ठाकरे बोलत होते.

विधानसभेतील विरोधी पक्षनेतअजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नानापटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतपाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खा. संजय राऊत, सभेचे संयोजक आ. सुनील केदार, माजीगृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासहमहाविकास आघाडीचे बहुतांशनेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ही आनंदाची गोष्ट आहे. पण हा पुरस्कारकुणाच्या हस्ते देण्यात आला?सच्च्या समाजसेवकासमोर झुकावेलागते. त्यांचे घराणे व्यसनमुक्तीचंकाम करते.                              दारुचे व्यसन घर उद्ध्वस्त करते पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते. रामराज्य महाराष्ट्रात कधी येणार? शेतकरी एवढा टाहो फोडत आहेत, आक्रोश करत आहेत, सरकार पंचनामे करायलाही जात नाही. मग मुख्यमंत्री जातात आणि आदेश देतात की, ताबडतोब पंचनामा करा. आता शेतकरी बोलत आहेत की, पंचनामे कशाला करताय तर आमच्या मैताला या. हे निर्लज्ज्ा आहेत, मैतालासुद्धा जातील, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. चंद्रकांत पाटील बोलले की, बाबरीच्या वेळेला बाळासाहेब नव्हते, मग तुमचे काका गेले होते का? बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या गोटात पळापळ झाली होती. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी फोनवर सांगितले होते की, जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले बोलतात. पण मला संघाला विचारायचे आहे की, नेमके तुमचे चाललंय काय? आमचे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही. यांचे हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. गोमुत्र शिंपडता त्यापेक्षा थोडेप्राशन करा, अक्कल येईल.

इकडे आलेली माणसे माणसे नाहीतका? हो संभाजीनगरच्या सभेला मुसलमान आले होते. ती माणसे नाहीत? भाजपने जाहीर करावेत्यांचे हिंदुत्व काय? असे आव्हानउद्धव ठाकरे यांनी दिले. आम्ही त्यांच्यासारखे पाठीवरवार करीत नाही आमचे सरकार यांनी गद्दारी करुन पाडले. यांनी आमच्या पाठीतवार केला. महाराष्ट्र शुरांचा आहे, पाठीमागून वार करणारा महाराष्ट्र नाही. आम्ही वार झेलू तर छातीवरआणि वार करू तर छातीवरचकरू. ही शिकवण आम्हालाछत्रपती शिवाजी महाराजांनी दिलीआहे. आजचे मुख्यमंत्री अयोध्येलाजातात. पण, हे खरंच रामभक्त असते तर आधी सूरत-गुवाहाटीलान जाता अयोध्येला गेले असते. आधीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वीकधीच अयोध्येला गेले नाही. आतामुख्यमंत्र्यांच्या मागे मागे गेले.तुझा शर्ट माझ्यापेक्षा भगवा कसा,यासाठीच यांचा दौरा होता, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.