आम आदमी पार्टीच्या वतीने गांधी पुतळ्याजवळ अर्ध नग्न आंदोलन

वर्धा/प्रतिनिधी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवले असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे वर्धा शहरात रविवार १६ रोजी आम आदमी पार्टी च्या वतीने गांधी पुतळ्याजवळ अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह अंदोलन करण्यात आले. सर्व आप कार्यकर्ता यांनी प्रतिकात्मक दोन्ही हाताला दोरीने दोन्ही हात बांधून अर्धनग्न अवस्थेत केंद्र सरकारने आम्हाला सुद्धा दडपशाहीच्या मार्गाने अटक करावी, विरोधी ताकत दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तथाकथित एक्साईज घोटाळ्याच्या चौकशीसाठी यापूर्वीच सत्येंद्र जैन यांना ताब्यात घेतलेले असताना आता अरविंद केजरीवाल यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलेले असल्यामुळे त्याच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी सत्याग्रह करण्यात आला. मुख्यमंत्री केजडीवाल यांच्या कामाची जगभरस्तुती होत आहे. आता राष्ट्रीय पक्ष बनलेला आप देशभर वेगाने पसरत आहे त्यामुळेच मोदी सरकार आम आदमी पार्टीला अडचणीत आणण्याचे सर्व प्रयत्न करीत आहे असे यावेळेस वर्धा जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले यांनी सांगितले.दिल्ली विधानसभेमध्ये केजरीवाल यांनी अदानी आणि मोदी यांच्या संदर्भाने अनेक आरोप केले होते.

मोदी यांच्यात काळ्या पैशाची गुंतवणूक अदानी यांच्या कंपन्यांमध्ये असल्याचा थेट आरोप केजरीवाल यांनी केला होता. तेव्हापासूनच अदानी यांना वाचवण्यासाठी केजरीवाल यांच्या विरोधात कट कारस्थान रचले जात होते, असा आरोप आपचे जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले यांनी केला.त्याच्या विरोधात आणि सत्याच्या बाजूने आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल असे वर्धा शहर प्रमुख मंगेश शेंडे यांनी म्हटले. आंदोलनात नितीन झाडे, अशोक चोपडे, अतुल तिडके, सुनील श्यामडीवाल, मयुर राऊत, ममता कपूर, वमिका कपूर, कल्पना रामटेके, शाखरुख पठाण, खलिद खान, प्रशांत देवतळे, प्रकाश डोडानी, धनंजय अग्रवाल, प्रवीण कलाल, प्रदीप न्हाले, वृशाल बानोकर, रवि येेंडे, जयंत अंबुलकर, प्रवीण टाले, राम मुरारका, धीरज टेकाम, फिरोज शेख, योगेश ठाकुर, संदीप भुभरे, विजय वैद्य, रवि बाराहाते, वासुदेव राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.