जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवळी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती

देवळी/प्रतिनिधी स्थानिक जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवळी येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ शिक्षक श्री पुरुषोत्तम उमरे होते तर प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त शिक्षक श्री बोडखे सर तर प्रमुख उपस्थिती मध्ये प्राचार्य श्री धर्मेश झाडे, उपमुख्याध्यापक श्री सुरेंद्र उमाटे व पर्यवेक्षक श्री भाऊरावजी जाधव हे होते. सुरवातीला पाहुण्याच्या हस्ते द्विप प्रज्वलन, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन व हारार्पण करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे भाषणे झाली. प्रमुख पाहुणे श्री बोडखे सर यांनी आपल्या भाषणातून डॉ बाबासाहेब यांच्या सारखी ज्ञानलालासा विध्यार्थ्यांनी स्वतः मध्ये बाळगावी असे सांगितले.
प्राचार्य श्री धर्मेश झाडे यांनी डॉ बाबासाहेब यांनी देशासाठी केलेल्या महान कार्याची माहिती विध्यार्थ्यांना देऊन भारताची राज्यघटना ही अद्वितीय असल्याचे सांगितले. याप्रसंगी श्री शशिकांत वाळके, उपमुख्याध्यापक श्री सुरेंद्र उमाटे, पर्यवेक्षक भाऊराव जाधव, श्री मेहेरकिरण गुजर, सौ प्रिया शिंदे, सौ पंचशीला भगत, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम उमरे यांची भाषणे आणि मनोगत झाले. कार्यक्रमाचे संचालन सौ शोभा रोकडे तर आभार प्रदर्शन श्री विनोद तडस यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक बंधू बघीनी सर्व विध्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.