आनंदाचा शिधा लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे साधला संवाद

वर्धा/प्रतिनिधी सर्वसामान्य गरीब लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने आनंदाचा सिधा उपक्रम सुरु केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्ह्यातील या योजनेच्या काही लाभार्थ्यांशी दुरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री मुंबई येथून तर लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातून संवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील आनंदाचा शिधा लाभार्थी लता बोबडे व शिवभोजनच्या लाभार्थी वैशाली काळे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसिलदार रमेश कोळपे, अन्न पुरवठा निरिक्षण अधिकारी प्रज्वल पाथरे, आनंदाचा शिधा लाभार्थी, शिवभोजन लाभार्थी व राशन दुकानदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात आनंदाचा शिधा लाभार्थी, शिवभोजन लाभार्थी, धान उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यासह अन्न व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण, अन्न पुरवठा विभागाचे सचिव आदी उपस्थित होते. प्राधान्य कुंटूबातील लाभार्थ्यांच्याजिवनात आनंद यावा यासाठी गुडीपाडवा, आंबेडकर जयंती सणानिमित्त राज्य शासनानेआनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम सुरु केला. जिल्ह्याला २ लाख ८२ हजार ३९७ हजार आनंदाचा शिधा किट प्राप्त झाले असूनरास्तभाव दुकानातून १ लाख ७१ हजार ७२६किटचे वितरण करण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात २५ शिवभोजन केंद्र सुरु असून दररोज २ हजार ४०० लाभार्थ्यांना शिवभोजन वितरीत करण्यात येत असल्याचेत्यांनी सांगितले.