स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलली!

नवी दिल्ली/प्रतिनिधी ओबीसींचे राजकीय आरक्षण लांबणीवर पडत आहे. आठ महिन्यात या प्रकरणावर कोणतीही सुनावणी झालेली नाही. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आजच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश निवडणुकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. मात्र, यासंदर्भातील सुनावणी तीन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. गेल्या आठ महिन्यांपासून ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी करण्यात आला होता. हे प्रकरण आजच्या कामकाजात ३९ नंबरवर सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, आज न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पावसाळ्यापूर्वी या निवडणुका होणं अशक्य असल्याचं बोललं जात आहे.