मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य

मुंबई/प्रतिनिधी कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहतंय, त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगपालिकेने तयारी सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. मुंबई मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेने मास्क सक्ती करण्याच्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेने आपल्या सर्व रुग्णालयात मास्क वापरण्यास सक्तीचे केले आहे. त्याशिवाय, मुंबई महापालिकेच े कार्यालय, सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय, वय ६५ वर्षांवरील अधिक वयाच्या व्यक्तींर्ना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.