अवकाळीचा विदर्भाला मोठा फटका!, पावसामुळे ७४०० हेक्टरवरील पिकांच नुकसान

नागपूर/प्रतिनिधी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात अनेक भागात गारपीट आणि वादळी वारा आला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केली आहे. अमरावती, अकोला बुलढाणा आणि वाशिमध्ये २४२ गावे अवकाळी पावसाने बाधित आहेत. एकूण ७४०० हेक्टर नुकसान झालं आहे. ७५९६ एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे. याचे पंचनामे सुरू झाले आहेत. बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ मदत दिली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार.
तीन वेळा अमरावती विभागात अशी आपत्ती आली आहे. यापूर्वी आलेल्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. त्याची मदत लवकर देण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. अकोला जिल्ह्यात देखील वेगळी घटना घडली. पारस येथे सात लोकांचा मृत्यू झाला तर ३५ लोक जखमी झाले आहेत. जखमींचा सर्व खर्च सरकार करणार आहेत. कृषीमंत्र्यांदी देखील त्या भागात भेट दिली आहे, असे फडणवीस म्हणाले.