सिमेंट पोल भरलेला ट्रक्टर दुभाजकावर चढून पलटी; चालक ठार, दुसरा गंभीर जखमी

समुद्रपुर/प्रतिनिधी तालुक्यातील शेडगाव पाटी जवळील सिमेंट पोल भरलेला ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन दुभाजकावर चढून पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला दुसऱ्या व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मृतकाचे नाव कुणाल बावणे (रा. मांडगाव) असे आहे. प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी ७ एप्रिलला परिसरातील माड़गांव येथील अंकित दांडेकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एम एच ३२सि.ए.७९३७) हा चालक कुणाल नानाजी बावणे व सोबत एकाव्यक्तीसह ट्रक्टरमध्ये इलेक्ट्रिकसिमेंट पोल घेऊन खंडाळ्याला जातहोते. दरम्यान, शेडगाव टाकीजवळअचानक चालकाचे वाहनावरुननियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन दुभाजकावर चढले त्यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रेकटर चालक कुणाल नानाजी बावणे(२५) वर्ष रा. मांडगाव याचा जागीचमृत्यू तर एक जण जखमी झाला. जखमीला उपचारासाठी सेवाग्रामरुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातामुळे दोन्ही बाजूने ५ ते ६ किमी वाहनांच्या रांगा लागल्याने दोन्ही कडील वाहतूक दोन तास खोळंबली होती. यावेळी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे प्रभारीसपाटे यांनी व सहकाऱ्यांनी वाहतूकखुली केली.