सीमा वाद पुन्हा पेटणार! कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मईंनी दिला एकनाथ शिंदे यांना थेट इशारा

बंगळुरु/प्रतिनिधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक गावातील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या बेळगाव कारवार कलबुर्गी व बिदर जिल्ह्यातील बारा तहसील मधील ८६५ गावांना योजनेचा फायदा होणार आहे. मात्र या योनजनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबाबत महाराष्ट्रसरकारला इशारा दिला. हा प्रकार त्वरित थांबवावा, असे बोम्मई यांनी सांगितले. बसवराज बोम्मई म्हणाले, मी महाराष्ट्र सरकारला ती योजना मागे घेण्याचे आवाहन करतो. तसे झाले नाही तर आम्हीही अशा योजना सुरू करू.
बोम्मई यांनी ट्विटच्या माध्यमातून कर्नाटकातील सीमावर्ती गावांतीललोकांना विमा देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडून ते लोक महाराष्ट्रात येत असल्याची प्रतिज्ञा पत्रे लिहून घेत असल्याचा दावा बोम्मई यांनी केला आहे. तसेच हे निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने हे वर्तन असेच चालू ठेवल्यास महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या कन्नड लोकांच्या संरक्षणासाठी कर्नाटक सरकारही अशीच विमा योजना राबवेल. बोम्मई म्हणाले की, कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद सुप्रीम कोर्टात आहे, पण महाराष्ट्र सरकार दोन्ही राज्यांच्या सीमा भागात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
कर्नाटक सीमेवरील लोकांना विमायोजनेचा लाभ देण्याचा आदेश योग्य नाही. तसेच दोन्ही राज्यांमधील संबंध बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. दरम्यान गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालीझालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सीमाप्रश्नाबाबत कोणताही संभ्रम निर्माण नकरण्याचे मान्य केले होतो.