विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करा, अन्यथा अनुदान विसरा

मुंबई/प्रतिनिधी नव्याने अनुदानावर येणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना वेतन अनुदानासाठी संच मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असून, त्यानुसारच या विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये २० टक्के अनुदानाच्या कक्षेत ८४ तर ४० टक्के अनुदानाच्या कक्षेत ४६ आणि ६० टक्के अनुदानाच्या कक्षेत १५६ शाळा असून या अपडेट करणे बंधनकारक आहे. त्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. तसेच आधार कार्ड अपडेट न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे अनुदान मिळणार नसल्याचे सांगण्यात आला आहे. तर अनुदानास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शालेय पोषण आहार त्याचबरोबर मोफत पाठ्यपुस्तक आणि इतर शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. त्यामुळे आधार कार्ड ३० एप्रिलपर्यंत अपडेट करणे गरजेचे आहेत. ठिकाणी कार्यरत शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी संच मान्यता गरजेची आहे. त्या अनुषंगाने प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना दिला जातो त्यांचे आधार कार्ड