बनावट नोटांचा मास्टर माईंड “ओमप्रकाश’ इंदोरमधून अटक

वर्धा/प्रतिनिधी बनावट नोटां चलन करणाऱ्या चौघांना वर्धा पोलिसांनी अटक केली होती. बनावटनोटा प्रकरणांत पोलिसांच्या विविध पथकांनीतपास करीत अंकुश कुमार मनोज कुमार रा.बुलंदशहर उत्तरप्रदेश याला दिल्लीतून अटक केली. अखेर अंकुशने बनावट नोटा इंदोर येथून आणल्याचे समोर येताच पोलिसांनी थेट इंदोर गाठून बनावट नोटांचा मास्टर माईंडओमप्रकाश भगवान लालवानी (२३) यालाअटक केली. बनावट नोटा चलन प्रकरणातपोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना बेड्याठोकून टोळीचा पर्दाफाश केला. काही तरुण बनावट नोटा चलणात आणतअसल्याची माहिती शहर पोलिस ठाण्यातीलकर्मचारी दिनेश तुमाने यांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी निखील लोणारे, स्वप्नीलउमाटे, प्रितम हिवरे, साहील साखरकरयांना १७ मार्च रोजी अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल ५०० रुपयांच्या ९४ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.
त्यांनी दिल्ली येथील राज नामक व्यक्तीने ५० हजार रुपयांच्या बदल्यात १ लाख २० हजारांच्या बनावट नोटा दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन दिल्ली येथून अंकुश कुमार मनोज कुमार (२०) याला २३ मार्च रोजी अटक केली. त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलिस कोठडी दरम्यान त्याने बनावट नोटा ओमप्रकाश भगवान लालवानी रा. इंदोर याने पुरविल्याची माहिती दिली. पोलिसांनी इंदोर येथे जात मास्टरमाईंड ओमप्रकाश याला अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, दिनेश तुमाने, जगदीश गराड, अनुप राऊत, राहुल भोयर, नितीन इटकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, विशाल मडावी, अंकित जिभे यांनी केली.
लॅपटॉपसह कलर प्रिंटर जप्त
पोलिसांनी इंदोर येथे जात बनावट नोटा छपाईसाठी वापरलेला लॅपटॉप, दोन कलर प्रिंटर, ५,५०० रुपयांच्या बनावटनोटा तसेच ५०० रुपयांच्या ४२८ बनावट नोटा २ लाख १४ हजार रुपये जप्त केले. तसेच दिल्ली येथील आरोपीकडून १ लाख १० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांकडे सोपविणार तपास
बनावट नोटां या इतर देशांतून येतअसल्याने तसेच नोटा तयार करणाऱ्याकागदाची आरोपी ओमप्रकाश याने “टेलिग्राम’ॲप डाऊनलोड करुन त्या ग्रुपवर मेसेज टाकून मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मागीलतीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. नोटाबनविण्यासाठी लागणारा कागद हा इतरदेशातून येत असल्याचा संशय असल्याने तसेच इतर देशांसोबत याचे धागेदोरे असल्यानेहा तपास एनआयए तसेच एटीएसकडेसोपविणार असल्याची माहिती पोलिसअधीक्षक नुरुल हसन यांनी दिली आहे.