सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे करताहेत किर्तनातून जलजागृती

वर्धा/प्रतिनिधी चला जाणूया नदीला अभियानांतर्गत धाम नदीच्या संवाद यात्रेने १४ गावांचा टप्पा पार केला आहे. ही यात्रा आर्वी तालुक्यातील खरांगणा येथे दाखल झाल्यान ंतर गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. प्रसिध्द सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे यांनी आपल्या प्रबोधनातून गावकऱ्यांमध्ये जलजागृती केली. यात्रेतील मान्यवरांच्या उपस्थितीत शिवार फेरी काढण्यात आली. अभियानाच्या समन्वयकांनी चला जाणूया नदीला अभियानाचा उद्देश व नदीचे महत्व गावकऱ्यांना समजावून सांगितले. अलिकडच्या काळात नद्या अस्वच्छ होत चालल्या आहे. नदी स्वच्छ, सुंदर व अमृत वाहिणी होण्यासाठी अभियान राबविण्यात येत असल्याचे यावेळी गावकऱ्यांना सांगण्यात आले. दोनही गावच्या सरपंचांनी देखील यावेळी खरांगणाच्या सरपंच आपले मनोगत व्यक्त केले. निलीमा अक्कलवार, मोरांगणाच्या सरपंच रेखाताई वाघमारे, अभियानाचे समन्वयक सुनील रहाणे, मुरलीधर बेलखोडे, भरत महोदय तसेच राजू राठी, विनेश काकडे, माधव कोटस्थाने, मिलींद भगत, विजय अढाव, अजय रोकडे, सतिश इंगोले व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरांगणा आणि मोरांगणा या दोन गावात एकाच दिवशी संवाद यात्रा दाखल झाली. गावात आगमण झाल्यानंतर गावकऱ्यांनी यात्रेचे स्वागत केले. गावकरी व संवाद गावकऱ्यांशी संवाद व धाम नदीची माहिती जाणून घेतल्यानंतर गावाच्या सभागृहात सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे यांचा जलजागृतीपर प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. यावेळी देखील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरांगणा मोरांगणा येथे दाखल होण्यापुर्वी संवाद यात्रेने पिंपळखुटा, दाणापूर, महादापूर, खैरवाडा, ब्राम्हणवाडा, काचनूर, नान्ही या गावांची यात्रा पुर्ण केली. प्रत्येक ठिकाणी यात्रेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.