आर्वीकरांना आत्मविश्वास; शकुंतलाची शिट्टी वाजणारच!

आर्वी/प्रतिनिधी ब्रिटीशकालीन शकुंतला रेल्वे २७ वर्षांपासुन बंद आहे. मात्र हा रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रूपांतर होवुन लवकरच सुरू झाल्या शिवाय राहणार नाही अशी आर्वी शहर व परिसरातील नागरिक अपेक्षेवर ठाम आहेत. आता जरी शकुंतलाची शिट्टी वाजली नाही तरी आगामी निवडणुकीत शकुंतलाच्या नावाचा पुन्हा गजर झाल्याशिवाय राहणार नाही, असा दृढ आत्मविश्वास आर्वीकरांमध्ये ठासून भरला आहे. आर्वी पुलगाव शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी सतत पाठपुरावा शासनाकडे सुरू आहे. पुलगाव-आर्वी-वरूड हा रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी अगोदर शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास कृती समितीचे अध्यक्ष बाबासाहेब गळहाट यांच्या नेतृत्वाखाली धडपड सुरू होती.
मात्र आतापर्यंत १०० किमी रेल्वे मिशन नावाने गौरव जाजु यांचे नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन व पुलगाव पासुन आर्वीपर्यंत जनजागृती व सभा यामुळे शकुंतला रेल्वे सुरू करण्याचा विषय चांगलेच ज्वलत झालेले आहे. गौरव जाजू व तरूणाांच्या आंदोलनामुळे आजपर्यन्त कोणीही नाही तो शकुंतला ब्रॉडगेज रूपांतर करून सुरू करण्याकरिता खा. रामदास तडस यांनी दोन ते तीन वेळेस लोकसभेत मुद्दा चांगलाच लावुन धरला. खा. रामदास तडस यांना २०१४ पासुन जोडलेले आर्वी विधानसभेचे आमदार दादाराव केचे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी व आर्वी विधानसभेच्या विकासाकरिता नेहमीच सकारात्मक राहणारे भुमीपुत्र सुमीत वानखेडे यांच्या प्रयत्नामुळे आर्वी वरूड सर्व्हे ही झाला व कित्येक कोटी रुपये मंजुरीचे प्रस्ताव सुद्धा हलविण्यात आले. त्यामुळे आर्वीवासियाच्या आशा व विश्वासात वाढ झाली.
खा. रामदास तडस, आ. दादाराव केचे, सुमीत वानखेडे शासनाशी संपर्कात असल्यामुळे शकुंतला झाल्याशिवास व ब्रॉडगेज रूपांतर झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची अपेक्षा व ठाम विश्वास १०० किमी रेल्वे मिशनचे गौरव जाजू व आर्वी शहरातील व परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.